रत्नागिरी दि.12 (सुनील नलावडे) तळकोकणात काल दुपार पासुन धुवाधार पाऊस पडत असुन संगमेश्वर, माखजन, लांजा, राजापुर मध्ये पुरस्थीती निर्माण झाली आहे. गड नदीच्या पुरस्थीतीमुळे माखजन,संगमेश्वर बाजारपेठा पाण्याखाली जावून खाडी पट्टयातील घरांमध्ये पाणी घुसल्याने नुकसानी झाली आहे. दमदार पावसामुळे राजापुर शहरामध्ये पाणी घुसले असुन अर्जुना व कोदवली नदीला पुर आला आहे. त्यामुळे राजापुर बाजारपेठ व गुजराळी यांना जोडणारा पुल पाण्याखाली गेल्याने दोन्ही कडील भागांचा संपर्क तुटला.

     अर्जुना कोदवली नदीच्या संगमावर असलेले पुंडलीक मंदीरही पुराच्या पाण्याखाली गेले आहे त्यामुळे राजापुरवासींयांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असुन राजापुर नगर परिषद हद्दीतील कोंडेतर पुलाखाली एक जण वाहून गेल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येते. आज सकाळी ही घटना घडल्याचे समजल्यावरून प्रशासनाकडून शोध मोहिम घेण्यात आली आहे. जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरल्याने होडीच्या सहाय्याने नागरिकांना पलिकडे न्यावे लागले असून जवाहर चौक बाजारपेठ पाण्याने वेढलेली आहे.

     राजापुर, संगमेश्वर, खेड, लांजा या ठिकाणी नदयांच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने सखल मैदान जलमय झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसानी झाली असुन नुकतीच करण्यात आलेली भातरोप लावणी काही ठिकाणी मळयात पाणी घुसल्याने वाहून गेली आहे. जिल्हयाभरातील अनेक ग्रामीण भागात नदी नाल्याना पुर आल्याने भातशेती पाण्याखाली आहेत रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!