उरण दि 25 (विट्ठल ममताबादे) दसरा हा हिंदू धर्मातील महत्वाचा व पवित्र सण. या दिवशी देवीचे पूजन अर्चन करून, विविध शस्त्राचे पूजन करून, आपटयाची पाने सोने स्वरूपात एकमेकांना वाटून घरातील आई वडिलांचा,जेष्ठ व्यक्तिंचा आशीर्वाद घेवून कोणतेही शुभ कार्यास सुरवात करून दसरा सण साजरा करण्याची प्रथा हजारो वर्षापासून हिंदू धर्मात चालत आलेली आहे. दस-या निमित्त अनेक ठिकाणी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी उरण तालुक्यात दसरा आगळया वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नवपरिवर्तन ग्रुप, दुर्गमावळा प्रतिष्ठान, सह्याद्रि प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज सेना, शिवप्रतिष्ठान संघटना-कोप्रोली, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, जरि मरि आई नवरात्रोत्सव मंडळ-भेंडखळ या संघटने मार्फत उरण तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या द्रोणागिरी किल्ल्यावर विविध उपक्रम साजरे करून दसरा सण साजरा करण्यात आला. दसरा सणाचे औचित्य साधुन अनेक दिवसांपासून दुर्गमावळा प्रतिष्ठान, नवपरिवर्तन ग्रुप, सह्याद्रि प्रतिष्ठान आदि संघटनेच्या माध्यमातून साफसफाई करण्याचे काम चालू होते. दसरा या सणानिमित्त सकाळी 8 वाजता श्री गणेश मंदिर (मुख्य प्रवेशद्वार) येथे गणेशपूजन व आरती करण्यात आली. द्रोणागिरी किल्ल्याच्या इतिहासाची माहिती सांगणारे माहिती फलकाचे अनावरण शिवशाहीर रायगड भूषण वैभव घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवेशद्वारचे नवीन ऊभारणीच्या कामा संदर्भात प्रत्येक शिवभक्तांना माहिती देण्यात आली. तद्नंतर स्वराज्याचे प्रतीक असलेल्या भगवा ध्वजाचे पुजन करण्यात आले. किल्ल्यावर शस्त्र पुजनही करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व विचारांवर आधारित अतिशय सुंदर पोवाडा शिवशाहीर तथा रायगड भूषण वैभव घरत यांनी सर्वांसमोर सादर केले. अनेक शिव भक्तांनी देशभक्तिपर गाणी,शिवरायांवर गाणी गायली. तर काही शिव भक्तांनी शिवाजी महाराजांवर त्यांच्या पराक्रमावर कथा सादर केली.
दस-याचे औचित्य साधुन छत्रपती शिवाजी महाराज सेना व शिवप्रतिष्ठान उरण तालुका तर्फे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टिकोणातुन किल्ल्यावर वृक्षारोपण करण्यात आले. जरी मरी आई नवरात्रोत्सव मंडळ भेंडखळ यांच्या तर्फे सह्याद्रि प्रतिष्ठान या संघटनेला किल्ल्यावर साफसफाई करण्यासाठी लागणारे सामान भेट स्वरूपात सामाजिक बांधिलकितुन देण्यात आले. तसेच आर्थिक सहकार्यही केले. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांने द्रोणागिरी किल्ल्यावर दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी द्रोणागिरी किल्ल्यावर विविध शहरातुन, खेडया पाड्यातुन आलेले शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!