पनवेल दि.२७: पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीच्या प्रचाराने वेग घेतला असून वावंजे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात महायुतीच्या उमेदवारांनी प्रभावी प्रचार करत आघाडी घेतली आहे. खैरणे आणि कानपोली परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तसेच ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत विकासकामांची माहिती दिली. महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास प्रकल्पांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून प्रचारादरम्यान त्याचा स्पष्ट प्रत्यय येत आहे.
वावंजे जिल्हा परिषद गटातून उमेदवार कमला देशेकर आणि वावंजे पंचायत समिती गणातून उमेदवार आरती काठे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. गावोगावी प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. या प्रचारावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजप नेते एकनाथ देशेकर, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सीता पाटील यांच्यासह नगरसेविका अरुणा दाभणे, शिवाजी दुर्गे, कृष्णा पाटील, डॉ. मोतीराम कोळी, नाथा आगलावे, जनार्दन आगलावे, काजल पाटील, माजी दिलीप वास्कर, महेश पाटील, वासुदेव पाटील, राजेंद्र गोंधळी, चंद्रकांत गोंधळी, प्रभाकर पाटील, सुरेश पोरजी, अंकुश पाटील, कैलास मढवी, सज्जन पवार, रमेश मते, गोमा पाटील, संजोग पाटील, भागर्व सांगडे, बाळकृष्ण पाटील, निवृत्ती पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद उमेदवार कमला देशेकर यांनी यापूर्वी सरपंच म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामाचा जनतेला अनुभव आहे, तर पंचायत समिती उमेदवार आरती काठे या सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत. जनतेमध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करणे हा त्यांचा स्वभाव असल्याने दोन्ही उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!