पनवेल दि.५: भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज पनवेल तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन, तसेच इतर सामाजिक कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्याचप्रमाणे महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली व तळोजा परिसरातही विविध विकासकामांचे लोकार्पण आणि शुभारंभ झाला. विचुंबे येथील शिवम कॉम्प्लेक्स ते ग्रीन व्हॅलीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन, केवाळे गावात अंतर्गत गटारे बांधणे कामाचे भूमिपूजन, दुंदरे ते शिवणसई रस्त्याचे उद्घाटन, रिटघर येथे नारायण उसाटकर ते दत्त मंदिरपर्यंत अंतर्गत रस्ता व गटार करणे कामाचे भूमिपूजन झाले, तसेच हरिग्राम ठाकूरवाडी येथे गरीब, गरजूंना तालुका युवा मोर्चाच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी नेते एकनाथ देशेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खारघर फणसवाडी येथे नवीन जलवाहिनीचे भूमिपूजन, खारघर सेक्टर 18 येथील त्रिकोण गार्डनचे लोकार्पण, बबन मुकादम यांच्या नगरसेवक निधीतून कळंबोलीतील विविध सोसायट्यांमध्ये हायमास्ट बसविणे, कोपरा येथे जलकुंभ लोकार्पण आणि तळोजा येथील उद्यानात प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीमधून ओपन जिमचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, प्रवीण पाटील, अ‍ॅड. नरेश ठाकूर, निलेश बावीस्कर, अमर पाटील, प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, संजना कदम, भाजपचे कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर तळोजा मंडल उपाध्यक्ष निर्दोष केणी, अमर उपाध्याय, सामाजिक कार्यकर्ते दिनेश केणी, कैलास घरत, समीर कदम, प्रकाश शेलार, संतोष गायकवाड, केशव यादव, श्रीकांत ठाकूर, संतोष गायकवाड, समीर शेख, सुरेश ठाकूर, भानुदास महेकर, दिलीप बिस्ट, खारघर, तळोजा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा आशा बोरसे, प्रिया मुकादम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

पूरग्रस्तांसाठी सरसावले असंख्य हात
वैश्विक कोरोना महामारी आणि महाड येथील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले होते, तसेच वाढदिवसाला हार-तुरे, पुष्पगुच्छ, जाहिरात, बॅनर यावर खर्च करण्याऐवजी आपणही शक्य तेवढी मदत वा निधी जमा करून पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध संस्था, संघटना आणि नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याचबरोबर आरोग्य महाशिबिर आणि अभीष्टचिंतन सोहळाही होत असतो. खांदा वसाहतीतील सीकेटी महाविद्यालय परिसरात कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. या दिवशी पनवेलमध्ये उत्सवाचे स्वरूप प्राप्त होत असते. यापूर्वीच आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त बुके न घेण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्याऐवजी वाढदिवसानिमित्त दरवर्षी ते पुस्तके स्वीकारतात. गेल्या वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. यंदाही कोरोना महामारीचे सावट कायम आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी महाप्रलय आला. महाडच्या तळीयेत दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली, तर शहर परिसरातील पुरातही अनेकांचे संसार वाहून गेले. त्यामुळे यंदाही आपला वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे बुके, हार-तुरे घेऊन येऊ नयेत, तसेच जाहिरात, बॅनरवर खर्च टाळावा. त्या ऐवजी शक्य होईल तितकी मदत पूरग्रस्तांना करावी, असे आवाहन त्यांनी केले होते. त्या अनुषंगाने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध संस्था आणि नागरिकांकडून महाड पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. पूरग्रस्तांना सर्वांत प्रथम आधार महाडमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात या परिसराचे नुकसान झाले, तर तळीयेत दरड कोसळून 84 जणांचा मृत्यू झाला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लागलीच पूरग्रस्त भागात धाव घेतली. येथील नागरिकांना धीर आणि आधार देण्याचे काम केले. इतकेच नाही, तर तातडीने मदतीचा ओघ सुरू केला. अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज सहा हजार नागरिकांसाठी जेवण बनवण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. शासन-प्रशासनाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी पोहचला नव्हता. त्यापूर्वीच आमदार प्रशांत ठाकूर हे राज्य व केंद्रातील नेतेमंडळींसोबत आणि जिल्ह्यातील युवकांची फौज घेऊन महाडकरांच्या मदतीसाठी धावून गेले, तसेच मदतकार्यासाठी तेथेच तळ ठोकून बसले. पूरग्रस्तांना अन्नधान्य, तयार भोजन, पाणी, अल्पोपहार, मेडिकल किट, कपडे, चादर, ब्लँकेट, टॉवेल अशी विविध सामग्री देण्याबरोबरच महाडमधील चिखलाचे साम्राज्य दूर करण्यासाठी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ पुरवून सेवाकार्य सुरू केले. आजही हे कार्य अखंडपणे चालू आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!