पनवेल दि.६: लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तींकडून अनेकांना फोन करून पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे नाव वापरून काही अज्ञात व्यक्ती व्यक्तींना फोन करून पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले. दूरध्वनी करणारे व्यक्ती पंजाबी भाषेत बोलत होते आणि आमदार ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे मागत होते. ज्या नागरिकांना संशय आला, त्यांनी या व्यक्तींना जाब विचारताच त्यांनी फोन बंद केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार ठाकूर यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, ३ मे रोजी मला माझ्या नावाने पैशांची मागणी करणारे फोन आल्याची माहिती मिळाली. फोन करणारे पंजावी भाषेत बोलत होते आणि माझ्या नावाने पैसे मागत होते. दूरध्वनी आलेल्या व्यक्तीने शंका व्यक्त करताच त्यांनी फोन बंद केला. त्यामुळे सावधगिरी म्हणून मी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझ्या नावाने इतर कोणाला फोन आल्यास मला कळवा किंवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

♦️‘काळाची पावले ओळखून नवीन तंत्रज्ञान अंगिकारा’- दिनकर गांगल
🛑”ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल उद्या उरणमध्ये

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!