मुंबई दि.१७: केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याचे अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत चर्चगेट येथील रेल्वे सूचना व तक्रार नोंदणी केंद्र सुरु झाले आहे. या केंद्राचे तसेच अंबरनाथ, कोपर स्थानकातील होम प्लॅटफॉर्मची निर्मीती करण्यात आली आहे. या सेवा प्रकल्पांचे केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले.
रेल्वे प्रवाशाच्या समस्यां आणि तक्रारींचे निराकरण व समाधान करण्याच्या दृष्टीकोनातून चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच अंबरनाथ आणि कोपर रेल्वे स्थानकातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या स्थानकांना भेट देत होम प्लॅटफॉर्मची निर्मिती करून लाखो प्रवाशांना दिलासा दिला आहे. या केंद्राचे उद्घाटन आणि होम प्लॅटफॉर्मचे लोकर्पण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते बुधवारी झाले. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरीषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर, माजी मंत्री आशिष शेलार, माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अतुल भातखळकर, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!