मुंबई दि.१९: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देतांना सोमण म्हणाले की हे खंडग्रास चंद्रग्रहण शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे दुपारी १२-३८ ते सायं. ४-१७ यावेळेत होणार आहे. परंतु त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे खंडग्रास चंद्रग्रहण आपणास दिसणार नाही. हे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया खंडाचा अतिपूर्वेकडील प्रदेश, उत्तर पश्चिम यूरोप, आफ्रिका खंडाचा वायव्येकडील प्रदेश, संपूर्ण अमेरिका आणि ॲास्ट्रेलिया येथून दिसेल. मात्र पुढच्यावर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मंगळवार, ८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचे दा, कृ. सोमण यांनी सांगितले.