अलिबाग दि.२९: रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच २३४ नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ११३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची संख्या २१९५ वर गेली असून आतापर्यंत १३५५ जणांवर उपचार सुरु आहेत.
आज सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा १३१, पनवेल ग्रामीण ५०, उरण ५, खालापूर ७, कर्जत ५, पेण ९, अलिबाग ४, मुरुड २, माणगाव ११, तळा १, रोहा ४, श्रीवर्धन २, महाड १, पोलादपूर २ असे एकूण २३४ रुग्ण सापडले असून आज पनवेलमनपा क्षेत्रातील ४ तर उरण परिसरातील १ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या १३३ वर पोहोचली आहे. मात्र आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा ६१, पनवेल ग्रामीण ७, उरण ४, कर्जत १८, पेन १, अलिबाग १३, रोहा २, श्रीवर्धन १, पोलादपूर ६ असे एकूण ११३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या १३५५ रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत २१९५ जणांनी जिल्ह्यात कोरोनावर मात केली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!