अलिबाग दि.11: आजच्या दिवसात 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि नव्या 834 रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 862 जण बरे झाले आहेत.
मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, उरण पाच, खालापूर व पेण प्रत्येकी तीन, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन आणि अलिबाग व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 413, अलिबाग 101, महाड 92, पेण 54, खालापूर 38, श्रीवर्धन 28, कर्जत 22, माणगाव 20, उरण 18, रोहा व पोलादपूर प्रत्येकी 12, तळा सुधागड व म्हसळा प्रत्येकी आठ असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 35,450 व मृतांची संख्या 974 झाली आहे. जिल्ह्यात 28,251 जण कोरोनामुक्त झाल्याने 6225 विद्यमान रुग्ण आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!