अलिबाग, दि.11: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1103 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 56 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-44, पनवेल (ग्रा)-7, कर्जत-1, मुरुड-3, माणगाव-1 अशा प्रकारे एकूण 56 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात एकाही व्यक्तीची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली नाही.


सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-229, पनवेल ग्रामीण-60, उरण-10, खालापूर-3, कर्जत-7, पेण-10, अलिबाग-5, मुरुड-3, माणगाव-6, तळा-2, म्हसळा-11, महाड-15, पोलादपूर-7 अशी एकूण 368 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-596, पनवेल ग्रामीण 198, उरण-159, खालापूर-10, कर्जत-24, पेण-13, अलिबाग-36, मुरुड-13, माणगाव-46, तळा-10, रोहा-23, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-18, महाड-2, पोलादपूर-13 अशी एकूण 1172 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-55, पनवेल ग्रामीण-2, उरण-1, कर्जत-7, अलिबाग-2 तळा-2, असे एकूण 69 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-36, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, खालापूर-1, कर्जत-3, अलिबाग-3, मुरुड-2, तळा-1, श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-5, पोलादपूर-1 असे एकूण 67 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

आतापर्यंत जिल्ह्यातून 5 हजार 023 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी 3 हजार 318 नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 98 आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी अंती ‘+’ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या 1 हजार 607 आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!