पनवेल दि.11: निसर्ग चक्रीवादळा मुळे पनवेल तालुक्यातील माची प्रबळ येथील नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटिल यांच्या सुनीता पाटील कंस्ट्रक्शनने सामाजिक बांधीलकी जपत 38 घरांना 2 हजार रूपयांची आर्थिक मद्त केली आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळाने पनवेल तालुक्यातील माची प्रबळ येथील आदिवासी वाडीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आदिवासी लोकांच्या घरावरील पत्रे, कौले उडून गेली आहेत काही घरांच्या भिंतीसुद्धा कोसळल्या आहेत.अश्या बिकट परिस्थितीत सामाजिक बाधिलकी म्हणून सुनिता पाटील कंस्ट्रक्शनने आदिवासी वाड़ीतील 38 घराना प्रत्येकी 2 हजार अश्या छोट्या स्वरूपाची मदत केली आहे. यावेळी नीलेश पाटिल यांनी बोलताना माची प्रबळ हे हल्ली खूप मोठे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. हजारोंच्या संख्येने तिथे पर्यटक येतात त्यांची सेवा तेथील आदिवासी बांधव करत असतात. आता त्यांच्यावर संकट आले आहे आणि आपण त्यांना मदतीचा हात पुढे केला पाहिजे असे सांगितले तसेच त्यांनी आदिवासी बांधवाना मद्त करण्याचे आवाहन केले आहे. या वेळी उद्योजक वैभव म्हात्रे, युवा नेते भरत पाटील, भाजपचे बेलवली गाव अध्यक्ष सतिश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण पवार, ज्येष्ठ नेते संतोष पाटील, जगदीश पाटील उपस्थित होते.