अलिबाग,दि. 09 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 52 हजार 342 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 76 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-35, पनवेल ग्रामीण-29, उरण-2, खालापूर-3, कर्जत-1, पेण-3, माणगाव-1, रोहा-2 असे एकूण 76 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 3 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-2, खालापूर-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-475, पनवेल ग्रामीण-282, उरण-50, खालापूर-41, कर्जत-22, पेण-57, अलिबाग-58, मुरुड-5, माणगाव-17, रोहा-34, सुधागड-8, श्रीवर्धन-3, म्हसळा-2, महाड-13, पोलादपूर-3 अशी एकूण 1 हजार 070 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-23 हजार 022, पनवेल ग्रामीण-6 हजार 696, उरण-1 हजार 956, खालापूर-2 हजार 546, कर्जत- 1 हजार 661, पेण-3 हजार 751, अलिबाग-4 हजार 736, मुरुड-414, माणगाव- 1 हजार 889, तळा-162, रोहा-2 हजार 317, सुधागड-388, श्रीवर्धन-389, म्हसळा-309, महाड- 1 हजार 697, पोलादपूर-409 अशी एकूण 52 हजार 342 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-104, पनवेल ग्रामीण-15, उरण-4, खालापूर-5, कर्जत-2 पेण-5, अलिबाग-5, माणगाव-7, रोहा-6, श्रीवर्धन-2, महाड-6 असे एकूण 161 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-563, पनवेल ग्रामीण-131, उरण-112, खालापूर-119, कर्जत-97, पेण-103, अलिबाग-138, मुरुड-24, माणगाव-37, तळा-9, रोहा-88, सुधागाड-26, श्रीवर्धन-21, म्हसळा-13, महाड-75, पोलादपूर-19 असे एकूण 1 हजार 575 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 2 लाख 13 हजार 212 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 158 आहे.