पनवेल दि.17: पनवेल महापालिका-१३, पनवेल ग्रामीण-९ तर उरण-१६ असे एकूण ३८ कोरोना बाधित रुग्ण आज जिल्ह्यात आढळून आले आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रातील आजचे १३ रूग्ण
नविन पनवेल: ६
नविन पनवेल, सेक्टर-१३, ए-टाईप चाळ येथील एकाच घरातील ४ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदरचे चारही जण किरकोळ फळ विक्रेते असून ते वारंवार फळे खरेदीकामी APMC मार्केट, वाशी येथे जात होते. तसेच या घरातील आणखी एक व्यक्ती याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आली आहे.
नविन पनवेल, सेक्टर-१३, ए-टाईप चाळ, वसंत निवास येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदरच्या दोन्ही व्यक्ती किराणा दुकान चालवितात. यापुर्वी सदर भागातील अनेक व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
खारघर: ४
खारघर, सेक्टर-३५, स्मित को.ऑप.सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख मुंबई एअरपोर्ट येथे CISF सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
खारघर, सेक्टर-१०, सनसिटी अॅवेन्यू सोसायटी येथील २७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे वडील बँक ऑफ इंडिया, शाखा माजगांव, मुंबई येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
खारघर, सेक्टर-१५, मकरंद विहार सोसायटी येथील १३ वर्षीय १ मुलगा कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर मुलाचे वडील चेंबूर पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच मुलाला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे: २
कामोठे, सेक्टर-१०, विक्रम टॉवर येथील ५० वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे पती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत.
त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे, सेक्टर-३६, तिरूपती कॉम्प्लेक्स येथील २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती ताडदेव पोलिस हेडक्वाटर्स, मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कळंबोली: १
कळंबोली, सेक्टर-१५, ब्लॅक स्मिथ कॉर्नर येथील २७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती एस.डी.एल.कंपनी, म्हापे येथे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे.
पनवेल ग्रामीण क्षेत्रातील आजचे रुग्ण ९
पालीदेवद-सुकापूर: ३
पालीदेवद-सुकापूर, स्वामी सदन हौ. सोसा., ता. पनवेल येथील १२ वर्षीय व ८ वर्षीय ०२ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेल्या आहेत. सदर व्यक्ती वडाळा, मुंबई येथून प्रवास करून पालीदेवद येथे आलेल्या आहेत.
पालीदेवद-सुकापूर, मंगल मुर्ती निवास, ता. पनवेल येथील ५२ वर्षीय ०१ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे.
कोपोली: २
कोपोली, फॉच्युन गार्डन, ता. पनवेल येथील ८१ वर्षीय, ४० वर्षीय ०२ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेल्या आहेत. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हे याआधी कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेले होते. सदर दोन्ही व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
शिरढोण: १
शिरढोण, ता. पनवेल येथील २७ वर्षीय ०१ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती सी.आय.एस.एफ.
उरण येथे कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
विचुंबे: १
विचुंबे, कृष्ण वंदना सोसायटी, ता. पनवेल येथील ५५ वर्षीय ०१ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे.
वहाळ: १
वहाळ, युनाईटेड होम्स, ता. पनवेल येथील ६६ वर्षीय ०१ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे.
केळवणे: १
केळवणे, ता. पनवेल येथील ५८ वर्षीय ०१ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे.
उरण क्षेत्रातील आजचे रुग्ण १६
करंजा, सुरकीचापाडा, कासवलेपाडा, कॉढरी पाडा, नवापाडा, ता.उरण येथे १६ व्यक्ती कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आढळून आल्या आहेत. सदर व्यक्तींबाबत प्रवासाबाबतची कोणतीही माहिती नाही. परंतू सर्व व्यक्ती हे पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यावाबत प्राथमिक निष्कर्ष आहे.
सदर व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे.