पनवेल दि.17: पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त खारघर आणि खारघर गावात नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 ह्या रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या औषधाचे वाटप करून साजरा करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली.
सोमवार 18 मे रोजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस आहे. कोरोंनाच्या संसर्गामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोंनाचे रुग्ण सापडल्याने आणि 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कामोठे आणि खारघरमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. कारण याठिकाणाहून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्या मार्फत या रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी या आजाराला घाबरू नये तर योग्य काळजी घेतल्यास कोरोंनावर मात केली जाऊ शकते .नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आयुष्य मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत सोमवार 18 मे रोजी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त खारघर येथे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील अर्सेनिक अल्बम 30 ह्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचे वाटप करून परेशदादांचा वाढदिवस साजरा करणार आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!