पनवेल दि.२६: पनवेलमध्ये आज कोरोना विषाणू बाधित 3 नवीन रुग्ण आढळून आले असून याच बरोबर एक दुःखद घटना सुद्धा घडली आहे. कामोठे येथील महाराष्ट्र पोलिस दलातील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्तीला अगोदरपासूनच कॅन्सर आजाराचा त्रास होणाऱ्या व्यक्तीचे दुख:द निधन झाले आहे.
आजचे नविन रूग्ण -०३ खालीलप्रमाणे :
1) आज कामोठे येथील ५१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती मुंबईमध्ये बेस्ट ड्रायव्हर आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
2) पनवेल येथील ५० वर्षीय १ महिला कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. हया राजेवाडी, मुंबई येथे स्टाफ नर्स आहेत. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
3) खारघर येथील ४३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती मुंबईमध्ये सी. ए. म्हणून काम करीत आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!