पनवेल दि.24: पनवेल महापालिका हद्दीत आज २० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ग्रामीणमध्ये आज कोरोनाचे ९ नवीन आढळले.
पालिका क्षेत्रात कामोठ्यात ११, नवीन पनवेल ६ तर ओवेपेठ, तक्का आणि नावडे फेज-२ येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे तर ग्रामीणमध्ये उलवे येथे ४, आदई, पालीदेवद, विचुंबे, उसर्ली, करंजाडे येथील प्रत्येकी एक नवीन कोरोनाबाधित रूग्णाचा समावेश आहे.

महापालिका हद्दीतील आजचे रुग्ण २०
कामोठे: ११

कामोठे, सेक्टर-३५, रिध्दी सिध्दी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. या कुटुंबातील एक महिला शताब्दी हॉस्पीटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून याआधीच ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. तिच्यापासूनच या पाच जणांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-८, शुभम कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख कुर्ला येथे कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-९, कृष्णकुंज सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख लालबाग पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून याआधीच ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-२१, सुरभी सोसायटी येथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती वडाळा डेपो येथे उप अभियंता म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

कामोठे, सेक्टर-१०, देवलीला सोसायटी येथील ४५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.

नविन पनवेल: ६
नविन पनवेल, सेक्टर-५ए, हरिमहल सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख याआधीच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या तिघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.

नविन पनवेल, सेक्टर-१३, ए-टाईप, चाळ नं.६२ येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर भागामध्ये याआधीच बरेच रूग्ण सापडले आहेत. या व्यक्तीला सुध्दा सदर भागातच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

नविन पनवेल, सेक्टर-१६, क्लासिक कल्पतरु सोसायटी येथील ५४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती धारावी बेस्ट बस डेपो येथे निरिक्षक म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

नविन पनवेल, सेक्टर-१३, ए-टाईप येथील २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर भागामध्ये याआधीच बरेच रूग्ण सापडले आहेत. या व्यक्तीला सुध्दा सदर भागातच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

तळोजा:१
ओवे पेठ येथील ५५ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही महिला मधुमेहाच्या उपचारासाठी वारंवार हॉस्पीटलमध्ये जात होती. सदर हॉस्पीटलमध्येच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

पनवेल, तक्का: १
मोराज रिव्हरसाईड पार्क, तापी या इमारतीमधील ३९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

नावडे: १
फेज-२, देवदृष्टी सोसायटी येथील ३० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती जेएनपीटी, उरण येथे डाक्यूमेंट क्लीअरींग या विभागात कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


ग्रामीणमध्ये आजचे नविन रूग्ण – ९
उलवे: ४

उन्नती अपार्टमेंट हौ.सोसा.सेक्टर १९,येथील २७ वर्षीय स्त्री, ४६ वर्षीय स्त्री, २६ वर्षीय स्त्री व २४ वर्षीय पुरूष असे चार व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील १ व्यक्ती यापुर्वीच कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

पालीदेवद-सुकापूर: १
साक्षीपार्क गंगोत्री हौ.सोसा. २५ वर्षीय स्त्री व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील १ व्यक्ती यापुर्वीच कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

आदई: १
प्रयाग गॅलेक्सी, येथील २८ वर्षीय पुरूष व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती ऍन्टॉप हील मुंबई येथे पोलीस विभागत नोकरीस आहे. सदर व्यक्तीस त्यांच्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

विचुंबे: १
ओमकार कृष्णा पार्क, येथील ५४ वर्षीय पुरूष, व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे.

उसरली खुर्द: १
येथील ५० वर्षीय पुरूष, व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती बी.एम.सी. मुंबई येथे नोकरीस आहे. सदर व्यक्ती त्यांच्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

करंजाडे: १
चामुंडा हिल, सेक्टर १, येथील २६ वर्षीय पुरूष, व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेण्यात येत आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!