पनवेल दि.१०: पनवेलमध्ये करोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते.
मृत झालेली व्यक्ती ही पनवेलमधील खारघर परिसरातील घरकुल वसाहतीत राहत होती, पेशाने रिक्षा व्यवसाय करायची या ३३ वर्षीय व्यक्तीचा नवी मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयात काल रात्री १०च्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, करोनासोबत त्याचे डेंग्यूचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर या व्यक्तीच्या घरातील सदस्यांनादेखील देखरेखेखाली रुग्णालयात ठेवण्यात आले. तपासणीअंती
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांच्या कडून मृत कुटुंबीयांतील इतर तिघांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याचे अधिकृत सांगण्यात आले आहे.
पनवेल पालिका हद्दीत करोनाचे एकूण १६ रुग्ण आढळून आले. त्यातील ४ रुग्ण हे खारघर परिसरात आढळून आले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!