रत्नागिरी दि.१० (सुनिल नलावडे) कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावाचे मोठे दडपण सगळीकडे आहे. चीन देशातल्या एका उहान गावात निर्माण झालेली ही महामारीची साथ रत्नागिरीतील साखरतर, राजीवडा या भागापर्यंत पोहोचली सुद्धा ! अशावेळी लोकांच्या जिवासोबत अनेक सामाजिक, व्यावहारिक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी केवळ कायदा सुव्यवस्थाच नव्हे तर लॉक डाऊन मुळे घरी अडकलेल्या, कोरोना मुळे सील केलेल्या गावात जाऊन पोलीस जनतेसाठी सर्वतोपरी मदत पोहोचवत आहेत. अशावेळी लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सुद्धा एक सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून रत्नागिरी आर्मी ने पुढाकार घेऊन रत्नागिरी शहर आणि परिसरातील विविध पोलीस स्थानके, चौक्या आणि रत्नागिरीतील विशेष कारागृह येथे जंतुनाशक फवारणी करण्यात केली.
सामाजिक भावनेतून काम करणारे अनेकजण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुढे यांच्या संककल्पनेतून साकार झालेल्या रत्नगिरी आर्मी मध्ये एकत्रित झाले आहेत. आपल्या रत्नागिरीसाठी काम करणाऱ्या या सैनिकांनी फवारणीसाठी पुढाकार घेतला. सर्वसामान्यांसाठी आपला जीव धोक्यत घालत असलेल्या पोलीस बांधवांच्या आरोग्याचीही काळजी आम्हाला आहे हाच संदेश यातून रत्नागिरी आर्मी ने दिला. यावेळी महेश गर्दे, डॉ चंद्रशेखर निमकर, सिद्धांत शिंदे, निहार वैद्य, धीरज पाटकर, सचिन शिंदे आणि अन्य रत्नागिरी आर्मी च्या सैनिकानि यामध्ये पुढाकार घेतला.जिथे २४ तास पोलीस बंदोबस्त असतो अशा चौक्या त्य्यामध्ये परटवणे, शिरगाव, भाट्ये, लाला कॉम्प्प्लेक्स, जयस्तंभ, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, कुवारबाव, शहर पोलीस स्थानक, वाहतूक शाखा, विशेष कारागृह या ठिकाणी हि फवारणी करण्यात आली. तसेच पोलीस व्हॅन मधेही फवारणी करण्यात आली आहे.