अलिबाग, दि.9: करोना विषाणूमुळे संपूर्ण जगात भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून जागतिक आरोग्य संघटनेने करोना या विषाणूला जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे. करोना विषाणूने महाराष्ट्रासह संपूर्ण देण्यात थैमान घातलेले आहे. यावर महाराष्ट्र शासनामार्फत वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) प्रकाश खोपकर यांची पनवेल तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.एन.तेटगुरे, संजय भोये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नखाते व बालविकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड, सहा.गटविकास अधिकारी विश्वास म्हात्रे यांच्या उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक,अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाड सेविका,आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर या सर्व कर्मचाऱ्यांनी प्राथमिक शाळा वहाळ या ठिकाणी कार्यशाळा घेऊन त्यामध्ये हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता, अत्यंत महत्वाचे असेल तरच घराबाहेर पडताना मास्क वापरणे तसेच सोशल डिस्टसिंग ठेवणे, घरातील व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे, अशा प्रकारे कुटूंब सर्वेक्षणासंदर्भात मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. ग्रामपंचायत गव्हाण,वहाळ,उलवे व तरघर या ग्रामपंचायतीतील सर्व महसूल गावातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण एकूण अठरा पथके तयार करुन करण्यात आले. 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, जि.प.सदस्य रविंद्र पाटील,समीर सुरेश पाटील, सरपंच व सदस्य ग्रामपंचायत वहाळ यांनी कुटूंब सर्वेक्षणासाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच ग्रामपंचायत वहाळमार्फत सर्व सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क व हॅडग्लोव्हज् पुरविण्यात आले. या पथकांमार्फत जवळपास 2 हजार 500 कुटुंबांचे सर्वेक्षण होऊन त्याअंतर्गत 10 हजार व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!