श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज दुपारी 2.35 वाजता चंद्रयान 3 पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने उड्डाण करण्यात आले. सुमारे 40 ते 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान-3 चे लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरतील.
आजचा दिवस भारत आणि भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चांद्रयान-3 चा ड्रीम प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज दुपारी 2.35 वाजता चंद्रयान 3 पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने उड्डाण करण्यात आले. सुमारे 40 ते 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान-3 चे लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरतील. संपूर्ण जगाचे लक्ष या चंद्र मोहिमेकडे लागले होते. जर भारताचा हा प्रयत्न यशस्वी ठरला तर दक्षिणी ध्रुव वर लॅंडर उतरवणारा पहिला आणि चंद्रावर यान उतरवणारा भारत देश चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत हा प्रयत्न रशिया, अमेरिका, चीन कडून करण्यात आला आहे.