गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेनचे काम पूर्ण करणार
पनवेल दि.१४: कोकणाच्या भविष्याची दिशा ठरवणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राज्यातील सरकार कटिबद्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाची अधिकार्‍यांसह पाहणी केली. या वेळी मंत्री चव्हाण यांनी काम लवकरात लवकर करण्यासंदर्भात सूचना केल्या.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रूपाने भविष्यात कोकणवासीयांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या महामार्गाच्या पाहणीसाठी गेल्या वर्षभरात सहा पाहणी दौरे केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सातवा दौरा केला. गणेशोत्सवापर्यंत या महामार्गाची एक मार्गिका पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.
मंत्रीमहोदयांच्या मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौर्‍याला पनवेलमधून सुरुवात झाली. या पाहणी दौर्‍यात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष राजेश मपारा, अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता नीरज चोरे, सुखदेवे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!