चिपळूण दि.१३ (सुनील नलावडे) कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाल्यास नक्कीच त्यावर सकारात्मक यशस्वी उपचार होऊ शकतात हाच संदेश घराघरात पोहचविण्यासाठी आँन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर विविध कार्यक्रमांव्दारे जनजागृती करत आहे. त्याच मोहिमेंतर्गत आज चिपळूण येथील ख्रिस्त ज्योती काँन्व्हेंट स्कूल, वालोपे, खदीजा इंग्लिश मिडीयम स्कूल, गोवळकोट यूनायटेड इंग्लिश स्कुल चिपलूण या तीन शांळांत चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून मुलांमध्ये कर्करोग जनजागृतीच्या अनुशंगाने ही स्पर्धा राबविण्यात आली. या मोहिमेत ४५० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला असून ५ ते ९ वी इयत्तेतील मुलांनी अतिशय विचार करायला लावणारी कलाकृती सदर करून तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि त्यामुळे होणा-या आजारांवरील बोलक दृश्य सादर केले. या प्रसंगी डाँ.शमशुद्दीन परकार, वैदयकिय संचालक, लाईफ केअर रूग्णालय तसेच आँन्को लाईफ केअर कँन्सरचे विनायक भोसले, प्रशासकीय कार्यकारी अधिकारी, यांच्यासह ख्रिस्त ज्योती काँन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर मिलाग्रीन व कलाशिक्षिका सौ.प्रणाली नातू, खदीजा इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापिक खुर्शीद शेख व कला शिक्षक श्री.उदय मांडे यूनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक कृष्णात शिंदे कला शिक्षक विशाल कदम आदी उपस्थित होते. मुलांनी रेखाटलेल्या या चित्रकृतीव्दारे कर्करोग आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन या लहान वयातही किती प्रगल्भ असल्याचे त्यांनी काढलेल्या कलाकृतीतून दिसून आले तसेच हिच मुले यापुढे आपल्या घरातील अथवा आजूबाजूला या वाईट सवयीं असणा-यांत जनजागृती करण्यास पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आश्वासन दिले. डाॅ. गौरव जसवाल, रेडीएशन आँन्कोलाँजीस्ट, आँन्को लाईफ केअर कँन्सर सेंटर, चिपळूण म्हणाले की, चित्रकला हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. अनेकदा आपण पाहिले आहे की एखादी चित्रकृती न बोलताही बरेच काही सांगून जाते आणि विद्यार्थी दशेतच या मुलांवर आरोग्यविषयक जनजागृती झाल्यास कोणत्याही दुर्धर आजारांचं निदान वेळीच होऊ शकेल म्हणून चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज या मोहिमेची सुरूवात केली आहे. आजची युवा पिढी खुप स्मार्ट आहे आणि आरोग्य विषयावर योग्य मार्गदर्शन आणि जनजागृती त्यांच्यात झाली तर ते आपल्या घरातील आई-वडिलांना याबाबत नक्कीच जागृक करतील हा विश्वास आहे. कर्करोगाचे निदान वेळीच झाले तर त्यावर मात करता येणे शक्य आहे. तसेच, कर्करोग म्हणजे सर्व संपले असा जो गैरसमज जनमानसात आहे तो नाहीसा होणे गरजेचे असून मुलांमार्फत हा संदेश घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न आहे. आँन्को लाईफ केअर कँन्सर सेंटर हे आद्ययावत कर्करोग उपचार केंद्र असून पुर्वी कोकणातील रूग्णांना उपचारासाठी दुस-या शहरात जावे लागत होते परंतू आता याठिकाणी अद्ययावत तज्ञत्रानासह शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजनेचा लाभही रूग्णांना मिळणार असल्याने यापुढे कर्करोग उपचारासाठी कुठेही अन्यत्र जाण्याची आवश्यकता भासणार नाही.