अलिबाग, दि.13: मुंब्रा ठाणे येथे दिनांक 13 ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून, भारतीय सैन्यामध्ये होणारी भरती प्रक्रिया पुर्णत: पारदर्शक असून, यामध्ये कुठल्याही स्तरावर पैशांची देवाण घेवाण होत नाही. दलाल किवा कुठलीही मध्यस्थ व्यक्ती सैन्यामध्ये भरती करु शकत नाही. मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जर कुणी ही व्यक्ती किंवा दलाल सैन्यात भरती करण्यासाठी पैसे किंवा इतर वस्तुची मागणी करत असेल तर आपल्या नजीकच्या पोलीस स्टोश्न मध्ये तक्रार करावी. आधिक माहीतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड अलिबाग दुरध्वनी क्रमांक 02141-222208 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रायगड-अलिबाग डॉ. पद्मश्री एस बैनाडे यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!