पनवेल दि.१३ (संजय कदम) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता राबविण्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क रायगड अधीक्षक आर. आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा उत्पादन शुल्क विभागातील निरोक्षक मुरूड व त्यांचा पथक, निरीक्षक पनवेल ग्रामीण व त्यांचा पथक तसेच निरीक्षक भरारी पथक क्रमांक २ पनवेल व त्यांचा स्टाफ या तीन्ही कार्यालयातील अधिकारी व जवान कर्मचारी यानी संयुक्तपणे खालापूर तालुक्यातील नावंडे डोंगर परिसर, कर्जत तालुक्यातील पळसदरी डोंगरपरिसर, माणगाव तालुक्यातील बेकरे गाव येथील डोंगराळ जंगलभागात, कर्जत, मुरूड तालुक्यातील टिटवी गाव डोंगर परिसर, तसेच पेण तालुक्यातील राधे गावाच्या खाडी किनारी अशा हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणांवर धाडी टाकून अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे अड्डे उध्वस्त केले.
सदर कारवाईत एकूण ९ ठिकाणांवर छापे मारून हातभट्टी निर्मितीचे साहित्य, ९६ लिटर तयार गावठी दारू तसेच १७८४० लिटर नबसागर व गुळ मिश्रीत रसायन असा एकुण रू. ८,०२,२६०/- किंमतीचा मुद्देमाल व ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची चाहूल लागताच सदर निर्मिती मध्ये सक्रीय असलेले काही आरोपी हे घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले परंतू सदर अज्ञात इसमांविरूध्द संबंधित विभागच्या निरीक्षक कार्यालयाकडून गुन्हे नोंद करण्यात आलेले असून विभागील अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
हि कामगिरी राज्य उत्पादन शुल्क रायगड अधीक्षक आर. आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मुरूड नागरगोजे व त्यांचे अधिकारी व कर्मचारी,, पनवेल ग्रामीण निरीक्षक उत्तम आव्हाड व त्यांचे अधिकारी व कर्मचारी, पनवेल भरारी पथक क्र. २. निरीक्षक रविंद्र पाटणे त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली असून संबंधीत निरीक्षक कार्यालयातील अधिकारी यांच्या कडून सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!