पनवेल,दि.१३ : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमांतर्गत दिनांक 12 एप्रिल रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा भिंगार व मोर्बे, खेरणे, पाली देवद येथील शाळेच्यावतीने प्रभातफेरी काढण्यात आली. नवीन पनवेलमधील सात बचतगटांमधील महिलाच्या बैठकीमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली .
लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांची (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम)अमंलबजावणी 33 मावळ लोकसभा मतदारसंघामधील 188 पनवेल विधानसभा मतदार संघांतर्गत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे. स्वीप आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ व स्वीप पथक प्रमुख अधिकारी मुख्य अभियंता संजय जगताप, गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत.
गेल्या काही दिवसापासून महापालिकेच्यावतीने व तहसील कार्यालयाच्यावतीने विविध शाळांच्या माध्यमातून प्रभातफेरीच्या माध्यमातून मतदान 33 मावळ लोकसभा मतदारसंघामधील 188 पनवेल विधानसभा मतदार संघांतर्गत मतदान जनजागृती केली जात आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा भिंगार व मोर्बे, खेरणे, पाली देवद येथील शाळेच्यावतीने प्रभातफेरी काढून मतदान जनजागृती करण्यात आली. तसेच मतदान जनजागृती साठी नवीन पनवेल येथील सात बचत गटाच्या महिलांची एकत्रित बैठक घेण्यात आली. यावेळी 85 वर्षावरील मतदार व दिव्यांग यांच्यामध्येही मतदान जनजागृती करण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!