अलिबाग, दि.25 : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी, पो.आजिवली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेले मौजे भिंगारवाडी हे संपूर्ण गाव व त्याच्या परिसर क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133