पनवेल दि.२३ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत परीमंडळ २ पनवेल येथील सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.
या पूर्वी असलेलले सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांची आर्थिक गुन्हे शाखा नवी मुंबई येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारे सहाय्य्क पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच विविध राजकीय पक्षाचे पदाधीकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

🛑कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा🔹रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!