पनवेल दि.20: भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
उपाध्यक्षपदी अमर प्रभाकर ठाकूर, महेश जनार्दन पाटील, जगदीश विलास आगिवले, सरचिटणीसपदी दिनेश रविंद्र खानावकर, शेखर प्रकाश तांडेल, चिटणीसपदी दिनेश रसाळ, चिन्मय राजीव समेळ, खजिनदारपदी भूषण एकनाथ जळे, सदस्यपदी जमीर बशीर शेख, अक्षय रवींद्र राणे, अमित झावरे, विवेक होन, उदित कुमार नाईक, परेश बाबुराव पाटील, परेश हितेंद्र बोरसे, सदस्य – ऋचिता गुरुनाथ लोंढे, सुशांत संजय मोहिते आणि आशिष केसरीनाथ कडू यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. 
कोरोना महामारीच्या काळात मोठ्याप्रमाणात रक्तदानाचे उपक्रम राबवून जिल्ह्यातून १००० पेक्षा अधिक रक्त पिशव्या संकलन, युवकांनी पीएम केअर्स फंडात मदत, आत्मनिर्भर युवा- आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत युवकांमध्ये मेड इन इंडिया वस्तूंचा वापर वाढावा यासाठी जागरुकता, ऑनलाईन वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, टास्क टू मेक द मास्क स्पर्धा असे अनेक उपक्रम करण्याबरोबरच मोदी भोजन वाटप, अन्न धान्य वाटपात युवा मोर्चाने सहभाग घेऊन हे उपक्रम यशस्वी केले. त्या अनुषंगाने युवा मोर्चाची टीम सदैव समाजोपयोगी उपक्रम राबवित राहील, अशी ग्वाही मयुरेश नेतकर यांनी कार्यकारिणी जाहीर करण्याच्या निमित्ताने दिली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!