अलिबाग दि.15: आज14 हजार गावांत ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. रायगड जिल्ह्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींच्या, तसेच पनवेल तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. रायगडातील 78 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 79% टक्के मतदान झाले.
612 जागांसाठी 1588 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून सोमवारी दि.18 रोजी सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
आज सकाळी 7.30 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 11.30 वाजेपर्यंत 35 टक्के, तर दुपारी दीड वाजेपर्यंत जवळपास 55 टक्के मतदान झाले. दीड वाजेपर्यंत 47 हजार 740 महिला व 49 हजार 381 पुरुष मिळून 97 हजार 121 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सुमारे 79% टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. मास्क घालण्याबरोबरच थर्मल गनच्या साहाय्याने तापमान मोजून व ऑक्सिमीटर लावून तपासणी झाल्यानंतरच मतदाराला मतदान कक्षात प्रवेश दिला जात होता. सॅनिटायझरची व्यवस्थाही ठेवण्यात आली होती. या वेळी मतदान कक्षातील कर्मचार्‍यांना मास्कबरोबरच फेसशिल्डही पुरवण्यात आले होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!