महापालिकेच्या दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन
पनवेल,दि.3 : महापालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या वाढते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असताना या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेने हाती घेतली आहे. पायाभूत सुविधांप्रमाणेच आरोग्य सेवेला आयुक्तांनी प्रथम प्राधान्य देऊन आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या आहेत. वर्षाच्या सुरूवातीला महापालिकेने नागरिकांना आरोग्यदायी भेट दिली आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने कळंबोली व कामोठे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आसुडगाव, तळोजा येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकुर, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी नगरसेवक,माजी नगरसेविका, महापालिका वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर सक्षमीकरणांतर्गत आरोग्य सेवांचा नागरिकांना झालेला लाभ
पॉलिक्लिनिक :- जुलै,2023 पासुन 1597 रुग्णांना विशेषतज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
कष्टकरीमजुर, वृध्दनागरिकांच्या सोयीसाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाची वेळ सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. माहे मे 2023 पासुन आजपर्यंत 71 हजार 575 नागरिकांनी यासेवेचा लाभ घेतला आहे.
महापालिकेच्या सुविधा
1. जननी शिशु कार्यक्रमांतर्गंत गरोदर मातांना 01 मोफत सोनोग्राफी सुविधा खाजगी सोनोग्राफी केंद्राबरोबर सामंजस्य करार करुन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
2. दोन खाजगी रक्तपेढ्यामधुन रक्तक्षय असलेल्या गरोदर मातांना मोफत रक्तपुरवठा केला जातो.
3. संशयित क्षयरुग्णासाठी मोफत डिजिटल X-ray सुविधा देण्यात येत आहे.
4. महिलांनागर्भाशयाच्यामुखाचाकर्करोगतपासणी (सोनोग्राफी – PROB तंत्रज्ञान Cervical Cancer Screening) सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
5. नवनिर्मित महानगरपालिकेत सुरूवातीला 20 ते 25 प्रकारची औषधे शासना मार्फंत उपलब्ध होत होती. सद्यस्थितीत 750 प्रकारचेऔषधी महापालिकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
6. मोफत रूग्णवाहिका सेवा देण्यासाठी पालिकेकडे सहा रूग्णवाहिका आहेत.
7. चार मोफत शव वाहिनी
8. पशुसंवर्धन विभागामार्फत श्वान व मांजरांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या प्रास्तावित आरोग्य सुविधा
1. नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचाविण्यासाठी 450 खाटांचे सुसज्ज् माता व बाल संगोपन रुग्णालय “हिरकणी” या नावाने रुग्णालयीन इमारत प्रस्तावित करण्यात आले आहे.
2. आरटीपीसीआर प्रयोगशाळा च्या ठिकाणी नियमित प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहे.
3. शहरातील नागरिकांना संदर्भिय आरोग्य सेवा नियमितपणे व मोफत पुरविणेकामी महापालिकास्तरावरुन 04 मोबाईल मेडिकल युनिट प्रस्तावित केलेले आहे.