पनवेल दि.४: रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नमो चषक’ अंतर्गत रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी ‘एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी’ हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन ‘नमो खारघर मॅरेथॉन २०२४’ हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ‘नमो चषक’ स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध कला व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. त्या अंतर्गत खारघर मॅरेथॉन, क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, सायक्लोथॉन, कॅरम, बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धा तसेच नृत्य, चित्रकला, गायन, वक्तृत्व या कला स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे. ‘नमो चषक’ अंतर्गत या स्पर्धांमुळे युवा पिढीला कला व क्रीडा स्पर्धेकडे आकृष्ट करता येणार असून पनवेल विधानसभा क्षेत्रात २५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांना सहभागी करण्याचे उद्दिष्ट आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
त्या अनुषंगाने १४ जानेवारीला खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या खारघर मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी ०५ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून पारितोषिक वितरण सोहळाही त्याच ठिकाणी सकाळी ०९ वाजता होणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सेलिब्रिटींची मांदियाळी लाभणार आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००६ साली पनवेल मॅरेथॉनच्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रारंभ झाला. प्रथम आयोजनापासून ते आजपर्यंत उत्तम आणि नीटनेटक्या आयोजनामुळे हि स्पर्धा उत्तरोत्तर यशस्वी होत गेली. यापूर्वीच्या मॅरेथॉन स्पर्धा ‘रन अगेंस्ट एडस’, ‘पर्यावरणाच्या संरक्षणासाठी’, ‘एक धाव आरोग्यदायी पनवेलसाठी’, ‘रन फोर निर्भय भारत’, ‘सदभावना दौड’, ‘एक धाव पाणी बचतीसाठी’, ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधात एक धाव’, ‘एक धाव महिलांच्या सन्मानासाठी’, ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झक्शन’, ‘हम फिट तो इंडिया फिट’, ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ अशी घोषवाक्य घेवून यशस्वीरित्या उत्कॄष्ठ आयोजनाने स्पर्धा पार पडल्या आहेत.सामाजिक व शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळया सामाजिक संदेशासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेत. यंदाची हि स्पर्धा १४ वी असून स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ०५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ०५ किमी अंतर, तसेच खारघर दौड गट ०३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड ०२ किलोमीटर अशा आठ गटात हि स्पर्धा होणार असून ०२ लाख रुपयांची बक्षिसे आहेत. तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यातील पुरुष खुला गट व महिला खुला गटासाठी १०० रुपये तर उर्वरित गटांसाठी २० रुपये नाममात्र`प्रवेश फी असणार असून हि प्रवेश फि सामाजिक उपक्रमासाठी वापरली जाते.
ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यशस्वी करण्यासाठी स्वागत, प्रसिध्दी, आयोजन, मार्ग नियोजन, प्रवेशिका देणे व घेणे, पंच व नियमावली, फिडिंग व स्पंजिग, साहित्य, नियंत्रण, मार्ग आखणी, प्रथमोपचार, बक्षिस वितरण अशा विविध समित्या असणार आहेत. स्पर्धेत ‘सहभाग घेण्याची अंतिम तारिख ०६ जानेवारी असून चेस्ट नंबर १० जानेवारीपर्यंत स्पर्धकांनी घेऊन जाणे अनिवार्य आहे. स्पर्धेची नाव नोंदणी www.khargharmarathon.in या संकेत स्थळावर तसेच बारकोड ऑनलाईन पद्धतीने करता येणार असून अधिक माहितीसाठी ०२२२७७४४४१०, ०२२२७७४४५७७, ०२२६८५७४४०१, ०२२६८५७४४०२, ०२२६८५७४४०७, ८८९८७७७७११ किंवा ८०९७६८४६६४ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि या स्पर्धेचा जास्तीत जास्त स्पर्धक, क्रीडारसिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्धा प्रमुख व महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.
- बक्षिसांचा तपशिल -
पुरुष खुला गट (फक्त रायगड जिल्हा) – अंतर १० किलोमीटर
प्रथम क्रमांक- २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक – १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट.
महिला खुला गट (फक्त रायगड जिल्हा) – अंतर १० किलोमीटर
प्रथम क्रमांक- २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक – १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट.
१७ वर्षाखालील मुले गट (फक्त रायगड जिल्हा)- अंतर ०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.
१७ वर्षाखालील मुली गट- (फक्त रायगड जिल्हा) अंतर ०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.
१४ वर्षाखालील मुले गट-(फक्त रायगड जिल्हा) अंतर०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.
१४ वर्षाखालील मुली गट-(फक्त रायगड जिल्हा) अंतर ०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.
विशेष आकर्षण खारघर दौड - अंतर ०३ किलोमीटर
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.
सिनिअर सिटीझन दौड - अंतर ०२ किलोमीटर
प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.