पनवेल,दि.16,: केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाची 2021-2022 पासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनि:स्सारण या दोन्ही प्रकल्पांना शासनाची प्रशासकिय मंजुरी मिळाली आहे. पाणीपुरवठा प्रकल्पाला केंद्र आणि राज्य शासन मिळून 148.16 कोटी व मलनि:स्सारण प्रकल्पाला 207.58 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. महापालिका या दोन्ही प्रकल्पात ३० टक्के आर्थिक वाटा उचलणार असून पाणी पुरवठ्यासाठी 44.45 कोटी रूपयांची तर मलनि:स्सारण प्रकल्पासाठी 62.27 कोटी रूपयांची तरतूद पालिका करणार आहे.
अमृत 2.0 अभियानांतर्गत सरोवरांचे पुनरुज्जीवन व हरित क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येत आहे. यापूर्वीच्या अमृत अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील 44 शहरांमध्ये मलनि:स्सारणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार या अभियानांतर्गत राज्याच्या रु.18236.39 कोटी प्रकल्प किंमतीच्या राज्य जलकृती आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांनी दिलेल्या तांत्रिक मान्यतेनुसार त्यास राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजीच्या व राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या दिनांक 08 डिसेंबर2022 रोजीच्या बैठकित या प्रस्तावास मंजूरी दिलेली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या दोन्ही प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानूसार महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पास 148.16 कोटी तर मलनिस्सारण प्रकल्पास 207.58 कोटींचा मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया करून लवकरच कामे हाती घेण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा योजनेमुळे 29 गावातील पाणी पुरवठा सुरळीत होऊन या गावातील पाणी टंचाई कायमची दूर होणार आहे. व मलनिस्सारण योजनेमुळे रहिवाश्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे. मलनिस्सारण केंद्र बांधणीमुळे पर्यावरणाचा समतेाल राखण्यास मदत होणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!