मुंबई दि.३० : केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन 125 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या माध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.
केंद्र शासनाच्या भारतीय पादत्राणे, चर्मोद्योग आणि साहित्य विकास कार्यक्रमाच्या उपयोजनेतून पादत्राणे आणि चर्मोद्योगासाठी हा विशाल समुह प्रकल्प करण्यात येणार आहे. 323 कोटींच्या या प्रकल्पासाठी 125 कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केले आहे. उर्वरित पायाभूत सुविधांच्या खर्चाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील रातवाडा औद्योगिक क्षेत्राची निवड केली त्यातून सुमारे 25 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, त्याचबरोबर चर्मोद्योग करणार्‍या उद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहे.
राज्यात विविध क्षेत्रांत औद्योगिक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून नुकतेच उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत 40 हजार कोटींच्या गुंतणूक प्रकल्पांना मान्यता दिली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!