पनवेल दि.30: पनवेल तालुक्याचे महसूल विभागाच्या सोईसाठी विभाजन करण्यात आले आहेत. अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करून तहसिलदार पदाच्या जबाबदाऱ्या दोन तहसिलदार आणि अपर तहसिलदार अशा दोन विभागात वाटून देवून पनवेल तालुक्याचे महसूल प्रशासनासाठी दोन गट पाडण्यात आले आहेत. महसूल विभागाने बुधवारी परिपत्रक काढून ही घोषणा केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचे नैना क्षेत्र, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई पुणे जुना महामार्ग, कोकण रेल्वे आदी महत्वाचे प्रकल्प, तालुक्यातील 29 गावांची पनवेल महापालिका, अल्पावधितच सुरू होण्याच्या मार्गांवर असलेली नवी मुंबई मेट्रो आदींमुळे पनवेल तालुक्याचा विकास झपाट्याने होतो आहे. नागरीकरणासोबत औद्योगीकरण वाढते आहे. स्थलांतरीत होणाऱ्या लोकसंख्येची भर पडत असल्यामुळे पनवेल तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयावर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. महसूल विभागाच्या कामात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कामात सुलभता येवून नागरिकांची कामे सुरळीत व्हावीत म्हणून पनवेल तालुक्याचे विभाजन करणे करणे गरजेचे होते. तालुक्याचे विभाजन होणार ही चर्चां अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर मंगळवारी सरकारने यावर शिक्कामोर्तब करून पनवेलमध्ये अपर तहसिल कार्यालयाची स्थापना करून आवश्यक पदांची निर्मिती केली. नव्या कार्यलयात अपर तहसिलदार आणि लिपिक टंकलेखक अशी दोन पदे तयार करण्यात आली आहेत. 188 गावांचे 10 मंडळांमध्ये दोन गटात वाटप करण्यात आले आहे. पनवेल प्रांतअधिकारी कार्यालयाच्या अंतर्गंत दोन्ही तहसिलदार कार्यालयाचा कारभार चालेल. महसूल विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे पुढील काळात महसूल विभागाच्या कामात सुसुत्रता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोकण आयुक्तांना आदेश देवून पनवेल येथे अप्पर तहसिलदार कार्यालय व पदनिर्मितीचे आदेश यापुर्वीच देण्यात आले होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!