पनवेलचे ८ विद्यार्थी;
अअलिबाग दि.२५: रशिया-युक्रेन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेन मध्ये अडकलेले रायगड जिल्ह्यातील कोणी नागरिक असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले होते. त्यानूसार जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन जाहीर केल्यानंतर रायगड येथील शिक्षणासाठी गेलेले २७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनास दिली आहे. त्यातील ८ जण पनवेल मधील असल्याचे सांगितले जाते.