पनवेल,दि.12 : पनवेल महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 1 मे पासून 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मर्यादित प्रमाणात शासन आदेशाने लसीकरण सुरू करण्यात आले होते तथापि दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याकारणाने शासनाने प्रथम या नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे 18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत थांबविण्यात आले आहे.
सदर लसीकरण केंद्रावर 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण होणार आहे. याची पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.