पनवेल दि.17: वाढदिवस म्हंटले की प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. यादिवशी प्रत्येकजण विविध माध्यमातून आपला वाढदिवस साजरा करत असतो. अनेक जण यादिवशी मोठमोठ्या पार्टीचे आयोजन करून देखील आपला वाढदिवस साजरा करीत असतात. मात्र पत्रकार मित्र असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ऍड. मनोहर सचदेव यांनी आपला वाढदिवस सामाजिक कार्यक्रम करून साजरा केला.
यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. मनोहर सचदेव यांनी अत्यंत गरजू मुलांना शालेय दप्तर व वह्यांचे वाटप पूज्यसिंधी पंचायत सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष केवल महाडिक, जेष्ठ पत्रकार संजय कदम, पत्रकार संदीप मुळीक, पत्रकार डॉन के. के., समाजसेवक रवींद्र पाटील, अल्पेश खंडागळे, अनुराग वाघचौरे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.