पनवेल दि.7: शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते व संचालिका संगिता विसपुते यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आदर्श शैक्षणिक समूहाच्या, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज, नवीन पनवेलमध्ये “आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२०” हा कार्यक्रम दिनांक ५ सप्टेंबर २०२० रोजी ऑनलाइन संपन्न झाला.
“आदर्श शैक्षणिक समुह म्हणजे कर्तुत्वाला कौतुकाची थाप देणारे हक्काचे व्यासपीठ” या कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अजयजी भामरे, अधिष्ठाता, वाणिज्य विद्याशाखा मुंबई विद्यापीठ, डॉ.चेतना सोनकांबळे, अधिष्ठाता, आंतरविद्याशाखा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, डॉ.लता मोरे माजी अधिष्ठाता, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हे प्रमुख पाहुणे तर विशेष अतिथी म्हणून यजुर्वेद्र महाजन, दीपस्तंभ संस्था, जळगाव हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ अॉनलाईन दीप प्रज्वलन व शिक्षक दिनाची महती सांगणारी ध्वनिचित्रफीत दाखवून करण्यात आला.
       या कार्यक्रमाचे सुरुवातीला  बी एड.व एम.एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे मॅडम यांनी केले. यामध्ये त्यानी गेली २ वर्षापासुन इंग्रजी माध्यमाच्या व विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांसाठी ही संस्था हा पुरस्कार देत असल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागातून एकूण ११९ अर्ज प्राप्त झाले त्यापैकी २६ उत्कृष्ट शिक्षकांना आदर्श विद्यारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच यातील आरती वर्मा यानां या वर्षीचा माहेर पुरस्कार प्रदान करण्यात आला. नंतर संस्थेच्या व संस्थापकाच्या कार्याचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफित सादर करण्यात आली.
         डॉ.लता मोरे मॅडम यांनी उपस्थित सर्वाना बहुमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर यजुर्वेद्र महाजन यांनी शिक्षकानी सामाजिक बांधिलकी कशी जपली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर आदर्श विद्यारत्न पुरस्कार प्राप्त मा.संजय जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन धनराजजी विसपुते व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब विसपुते यांनी आदर्श पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात संस्थेच्या सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    शेवटी बी.एड., एम.एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची  सांगता करण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!