पनवेल दि.12 :पनवेल महापालिका क्षेत्रातील जैवविविधतेचे संवर्धन व्हावे, यासाठी पालिका आग्रही असून त्याबाबत या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध तज्ज्ञांच्या सूचनांसाठी आज जैवविविधता व्यवस्थापन समितीची बैठक आज पालिकेत झाली. यावेळी समितीने जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आपल्या ठोस कृती कार्यक्रम आराखड्याविषयी चर्चा करण्यात आली. महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीस नगरसेवक, कृषी अधिकारी, कोळी बांधव, स्वयंसेवी संघटना, वनविभाग, अदिवासी विभागाचे अधिकारी, सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ, पक्षीतज्ञ उपस्थित होते. यावेळी पनवेल क्षेत्रातील जैवविविधतेविषयी चर्चा करण्यात आली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या समितीच्या कामाबद्दल माहिती घेऊन, जैव विविधतेच्या संवर्धनासाठी कोणत्या कोणत्या उपाय योजना करता येतील यावर चर्चा केली.
यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी पनवेल महापालिका हद्दीतील जैवविविधता त्याचे संवर्धन त्याचे उपयोजन, वापर आणि त्यामधील भागीदारी या विषयीमाहिती सांगितली. सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी जैवविविधता समितीची कामे उदाहरणासह पटवून देत त्यांच्या स्वामित्व हक्काविषयी सर्वांना माहिती सांगितली.
या बैठकित जैवविविधता समितीच्या अहवालात समाविष्ट करण्यात येणाऱ्या विविध विषयांचा मागोवा घेत त्यावर चर्चा केली. यावेळी समितीच्या सदस्यांनी पनवेल महापालिका हद्दीतील आढळणारी जैवविविधता त्याचे संवर्धन करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना यावर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री मयुरेश्र्वर महिला व बालकल्याण संस्थेच्या श्रीमती शेबेंकर यांनी ही समिती कशा पध्दतीने काम करेल याची माहिती दिली.
या बैठकिस नगरसेवक अरूणकुमार भगत, नगरसेविका चारूशिला घरत, नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेवक रविंद्र भगत, वनविभागाचे प्रतिनिधी संजय पाटील, कृषी विभागाचे प्रतिनिधी रविंद्र पाचपुते, स्थानिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी भगवान पाटील, स्थानिक कोळी समाजाकडून देवचंद्र कोळी, आदिवासी समाजाचे महादेव मधे, स्वयंसेवी संघटनेकडून अशोक गायकवाड, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ दिपाली मनमानडकर, पक्षीतज्ञ निखिल भोपळे उपस्थित होते.