पनवेल दि.११: रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पनवेलमधील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रूग्णालयला भेट देण्यात आलेल्या सहा शवपेट्या, जनरेटर सेट, फिजिओथेरपी साहित्य, एक्स-रे रूम लेड पार्टिशियन आणि अपघात विभाग ऑपरेशन थिएटरमध्ये सी-आर्म युनिट इ. साहित्याचा लोकार्पण सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार रोटेरिअन प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना नियमांचे पालन करून महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रूग्णालय पनवेल येथे झालेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सदर प्रोजेक्टसाठी सहकार्य करणार्‍या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चॅरीटेबल ट्रस्टचे चेअरमन सुधीर कांडपिळे, क्लबचे मा. अध्यक्ष डॉ. प्रमोद गांधी, डॉ. प्रकाश पाटील, मा. अध्यक्ष प्रकाश श्रृंगारपुरे, कंत्राटदार राहूल नाईक आणि रुत्विक शाह आदि मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, सिव्हिल सर्जन डॉ. सुहास माने, डॉ. बसवराज लोहारे,ट्रस्टचे सचिव राजेंद्र ठाकरे, क्लबचे अध्यक्ष हर्मेश तन्ना, सचिव कल्पेश परमार आदि मान्यवरांसह बहुसंख्य रोटेरियन्स आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!