पनवेल दि. 22 : पनवेल महापालिका आयुक्तांच्या आदेशाने लाॅकडाऊन कालावधीत काही दुकाने विशिष्ट दिवशी उघडण्याची काही अटींवर परवानगी दिली होती. कोरोना चा प्रकोप कमी व्हावा यासाठी लाॅकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. परंतु दैनंदिन जीवन देखील त्यामुळे प्रभावित होत आहे. यासाठी शासनाने काही बाबतीत सवलती देण्याचा अधिकार त्या त्या स्थानिक प्राधिका-यांना दिलेला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात यानुसार एकल दुकानांना विशिष्ट दिवशी उघडण्यास परवानगी दिली होती.
परंतु याकडे दुर्लक्ष करून काही दुकानदार वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याचा भंग करत आहेत. पनवेल ओरियन मॉल मधील बिग बाजारमध्ये आज शुक्रवार असल्याने दुकान सुरु करण्यास परवनागी नसताना कापडाचे दुकान चालू ठेवून मनपाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती “ड” चे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने सदरचे दुकान बंद करून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत जर कोणी लाॅकडाऊनच्या आदेशांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!