पनवेलदि. ७: पनवेल महानगरपालिकेत होत असलेल्या नोकर भरतीच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर आणि जनतेची फसवणूक एक इसम करीत असल्याचे उघडकीस आले. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
पनवेल पालिकेची नोकरभरती रितसर ऑनलाईन अर्ज आणि केंद्रावर लेखी परिक्षा घेऊन होत आहे. असे असतानाही उमेदवारांना अमिष दाखवण्याचा प्रकार करण्यात येत असल्याचे समोर आले. हा प्रकार करणाऱ्या सदर इसमाच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या ३७७ विविध पदांसाठी नुकताच भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल झाल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा राज्यातील विविध केंद्रावर पारदर्शकपणे सर्व दक्षता घेऊन डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडली. सर्व प्रक्रिया रितसर आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे जाहीर करतानाच दरम्यानच्या काळात या सर्व प्रकियेत फसवणुकीचा प्रकार घडण्याची शक्यता आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमातून अधोरेखित केली होती. त्या अनुषंगाने तशी काळजीही या प्रक्रियेत घेण्यात आली. मात्र लेखी परिक्षेच्या वेळी पवई येथील केंद्रावर एका इसमाने पैसे घेऊन पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे अमिष काही उमेदवारांना दाखवले. तसेच माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचेही नाव घेतले. परेश ठाकूर यांची बदनामी आणि उमेदवारांची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा त्या इसमाने केला आहे. त्या बाबींची गांभीर्य दखल घेऊन नाहक बदनामी, नोकर भरतीत गैरप्रकार आणि उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या इसमाविरोधात पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!