पनवेल दि.17: सिडको ने सिमेंटची जंगले उभे केले मात्र येथील स्थानिक प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठी खेळाची मैदाने सिडकोच्या आराखड्यामध्ये नाहीत. याकरता कामगार नेते तसेच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर सिडकोने मोरवे गावाकरता अधिकृत मैदान मंजूर करून देत माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते या मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी मोरावे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून तसेच श्रीफळ वाढवून मैदानाचे उद्घाटन करण्यात आले तर कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करून श्रीफळ वाढवून बॅटिंग केली.
स्वर्गीय दिबा पाटील तसेच जनार्दन भगत साहेब यांनी या भागाला मोठा इतिहास दिलेला आहे .1984 च्या आंदोलनातील काही किस्से सांगत कामगार नेते महेंद्र घरत यांनी अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजे आपला हक्क आपण मिळवलाच पाहिजे, या मैदाना करता मोराव्यातील ग्रामस्थांनी चिकाटी सोडली नाही त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करेन.
या कार्यक्रमाप्रसंगी उत्तम कोळी श्रीकांत म्हात्रे, लहू मात्रे, मदन पाटील, निलेश खारकर, धावजी पाटील, विनायक पाटील, चंद्रकांत म्हात्रे, सचिन म्हात्रे, मयूर म्हात्रे, यज्ञेश भोईर, प्रणय कोळी, संजय पाटील, अमर म्हात्रे ,काशिनाथ म्हात्रे, मिलिंद म्हात्रे, चिंतामण गोंधळी, रुपेश ठाकूर, उमेश ठाकूर, संकेत भोईर त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित होते.