नामदार उदय सामंत, नामदार मंगलप्रभात लोढा यांची लाभणार प्रमुख उपस्थिती
पनवेल दि.२३: दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेलमध्ये शनिवार दिनांक २४ जून रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यास राज्याचे उद्योग मंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दिवंगत दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड- अलिबाग, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम २४ जून रोजी सकाळी ०९ वाजता आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात होणार आहे.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कॉ. भूषण पाटील, पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133