पनवेल, दि.22: भटक्या मांजराच्या संख्येवर नियंत्रण आणणेकरिता भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जसा नसबंदी कार्यक्रम राबविण्यात येतो, त्याच धर्तीवर भटक्या माजंरासाठी नसबंदी कायदा राबविण्याच्या ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्या सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या, त्याप्रमाणे इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स, इंडिया संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने भटक्या मांजराचे लसीकरण व निर्बिजीकरण केंद्र सरू केले आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या पोदी येथील श्वान नियंत्रण केंद्राचे उद्घाटन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, पशुधन वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान गीते, मुख्य सर्जन डॉ. हनुमान घनवट, प्रभाग अधिकारी रोशन माळी ,आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अरूण कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या केंद्रामध्ये पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील भटक्या मांजरी तसेच भटक्या मांजरींचे लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात येत आहे. वर्षाला सरासरी 300 मांजरींचे लसीकरण व निर्बिजीकरण व 200 आजरी मांजरींवर औषधोपचार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या या केंद्रावरती दर मंगळवार, गुरूवार, शनिवार मांजरीचे 9 ते 5 यावेळेत लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात येणार आहे.
महापालिकेकडे या केंद्राकडे चार रूग्णवाहिका असून महापालिकेतील या वाहिकेच्यामाध्यमातून भटके कुत्रे व भटके मांजर पकडण्यात येणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!