पनवेल दि.०३: पनवेल एसटी आगाराच्या दुरावस्थेबाबत प्रवासी संघ आक्रमक झाला असून या स्थानकाच्या दुरुस्तीकामाबाबत पुढाकार न घेतल्यास येत्या 1 नोव्हेंबर पासून उपोषणाचा इशारा प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
या पत्रकार परिषदेला प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ भक्तीकुमार दवे, उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, सचिव श्रीकांत बापट व मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ भक्तीकुमार दवे यांनी वेळोवेळी शासनाकडे केलेल्या पाठपुरावा संदर्भात माहिती दिली. तसेच यावेळी वेळोवेळी केलेल्या आंदोलने व वरिष्ठांची बैठक आदी बाबत स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुद्धा सहकार्य केल्याचे सचिव श्रीकांत बापट यांनी सांगितले. तर अभिजित पाटील यांनी एसटी स्टँडच्या दुरावस्थेबाबत संताप व्यक्त करून महामंडळाच्या मनमानी कारभाराचा त्यांनी निषेध केला आहे. तसेच प्रवाशी वर्गांना भेडसावणाऱ्या समस्या अत्याधुनिक पद्धतीने आगार उभारण्यासंदर्भात त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष काम सुरु करावे अन्यथा आम्हाला उपोषण करावे असे सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133