पनवेल दि.६: दृष्टप्रवृत्ती, वाईट विचारांवर विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दसर्‍यानिमित्त पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी येथील मैदानात रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पनवेलमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम झाला. मिडलक्लास सोसायटी मैदानातील झंकार नवरात्रोत्सवात दसर्‍यानिमित्त खास रामचरित्रावर आधारित रामलिलेचे नाट्यमय सादरीकरण करण्यात आले. बुधवारी रात्री हिंदू संस्कृतीनुसार तब्बल 25 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. आज आपण रावण दहना सोबत आपल्यातील क्रोध, मोह, लोभ, वासना, गर्व, मत्सर, द्वेष, निराशा, आळस, अज्ञान या सर्व गोष्टींचे दहन करून विजयादशमी साजरी करीत असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, मिडलक्लास सोसायटीचे अध्यक्ष राजू गुप्ते, मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुमीत झुंजारराव आदी उपस्थित होते. मिडलक्लास सोसायटी मैदानात या वर्षी साकारलेली रावणाची प्रतिमा 25 फूट असून यामध्ये बांबूच्या काठ्या, पुठ्ठा, कागदाचा वापर करण्यात आला होता, तसेच रावणाची प्रतिकृती बनविण्यासाठी खास दिल्ली येथून दरवर्षी मुंबई येथे तीन महिने अगोदर कारागिर येऊन काम करतात. यंदा पनवेलमध्ये प्रथमच दिल्लीतील कारागिरांकडून दसर्‍यानिमित्त रावणाची प्रतिकृती बनवून घेतली होती. या वेळी रामलीला व रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी तसेच दसरा सण साजरा करण्यासाठी नागरिकांनी केली होती.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!