पनवेल दि.०२: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देशमुख यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीची बैठक रविवारी (दि. 31) मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. या वेळी वाय. टी. देशमुख यांची संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. देशमुख यांना पहिल्यापासूनच या संस्थेचे आकर्षण होते. त्यांचे शिक्षणही याच संस्थेतून झाले आहे. त्यामुळे या नामांकित संस्थेत काम करण्याची त्यांची इच्छा होती. ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पूर्ण करीत ‘रयत’मध्येही त्यांना सहकारी करून घेतले आहे. या नियुक्तीबद्दल ‘रयत’च्या पदाधिकार्‍यांकडून देशमुख यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133