31 जुलै 2022 पर्यंत सुमारे 5.83 कोटी विवरणपत्रं झाली दाखल
नवी दिल्‍ली,दि.२:
31 जुलै 2022 या दिवशी (पगारदार करदात्यांची आणि इतर गैर कर लेखापरीक्षण प्रकरणांची देय तारीख) आयटीआर दाखल करण्यात वाढ होऊन एकाच दिवशी म्हणजे 31 जुलै, 2022 रोजी 72.42 लाखांहून अधिक आयटीआर दाखल केले गेले. मूल्यांकन वर्षे 22-23 साठी 31 जुलै 2022 पर्यंत दाखल केलेले एकूण आयटीआर सुमारे 5.83 कोटी आहेत. ई-फायलिंग पोर्टलने देखील 31 जुलै 2022 रोजी नवे मानक निर्धारित केले. या दिवशी आयटीआर फाइलिंगचा सर्वोच्च वेग प्रति सेकंद : 570 (4:29:30 वाजता), आयटीआर फाइलिंगचा सर्वोच्च वेग प्रति मिनिट : 9573 (संध्याकाळी 7:44 वाजता) ), आणि आयटीआर फाइलिंगचा सर्वोच्च वेग प्रति तास : 5,17,030, (संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 6 दरम्यान) इतका नोंदवला गेला.

मूल्यांकन वर्ष 22-23 साठीचे पहिले 1 कोटी आयटीआर 7 जुलै, 2022 पर्यंत दाखल झाल्यामुळे ई-फायलिंगची सुरुवातीची गती तुलनेने खूपच कमी होती. 22 जुलै, 2022 पर्यंत सुमारे 2.48 कोटी आयटीआर दाखल करण्यात आल्याने ही गती किरकोळ वाढली. देय तारखेला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सरकारने जाहीर केल्याने, आयटीआर भरण्यात मोठी वाढ झाली आणि 25 जुलै 2022 पर्यंत 3 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले. 31 जुलै, 2022 रोजी दिवसअखेर मागील सर्व विक्रम मोडीत काढत 72.42 लाख आयटीआर दाखल केले गेले. (2019 मध्ये कमाल 49 लाख आयटीआर दाखल झाले होते) एकट्या जुलै 2022 मध्ये 5.13 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!