अलिबाग दि.११: आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने महाबळेश्वर पोलादपूर मार्ग पाच दिवस वाहतुकींसाठी बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्त्यावर आलेले दगड, गोटे व माती काढण्याच्या कामाकरिता 04 दिवस लागणार असल्याने दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 रोजीपर्यंत सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड व तहसिलदार पोलादपूर यांनी केलेल्या विनंतीनुसार दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 या कालावधीत सदर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्याबबात जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.
त्यानुसार नागरिकांनी सदर कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूर-माणगाव ताम्हाणी मार्गे पुणे-सातारा व पोलादपूर-चिपळूण-पाटण-सातारा-कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!